IMPIMP
Make the unemployed MP sit at home now Make the unemployed MP sit at home now

शिरूरमध्ये कुणाची किती हवा ? एक्झिट पोलमध्ये आली मोठी माहिती

पुणे : बारामती, माढाप्रमाणे शिरूर मध्ये देखील शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसून आले आहेत. तर अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण शिरूरच्या जागेसाठी अजित पवारांनी जंगजंग मैदान पछाडले आहे. त्यामुळे येत्या ०४ जुन ला काय निकाल लागणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहील आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शिरूर मध्ये अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार ? याची चर्चा होती. शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी मोठा दावा ठोकला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने शिवाजीराव आढळराव पाटलांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आढळराव पाटील यांच्या सह महायुतीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार केला. अजित पवारांच्या देखील शिरूर मध्ये मोठ्या सभा झाल्यात.

दरम्यान, एक्झिट पोलमध्ये याठिकाणी अमोल कोल्हेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे. पक्षात फुट पडल्यानंतर कोल्हेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील शिरूर मध्ये भावनिक प्रचार करण्याचा प्रयत्न केला तर स्वतः शरद पवारांच्या अनेक सभा कोल्हेंसाठी शिरूर मध्ये पार पडल्या.