नांदेड : काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत ते आज नांदेडमध्ये बोलत होते. या प्रकरणावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे,अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले होते.
वडेट्टीवार काय म्हणाले…
मी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकले नाही. पण मधल्या काळात काही निधी कमी मिळाला होता, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन प्रश्न मिटवला होता. सर्वांना समान निधी मिळाला आहे. आता सरकारमध्ये कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
Read Also
उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने देखील विधानपरिषदेची ऑफर दिले होती,पण… विजय वडेट्टीवार यांचा मोठा खुलासाhttps://t.co/nOcBAT4VFq#UrmilaMatondkar #Congress #VijayWadettiwar @VijayWadettiwar @UrmilaMatondkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020