जाधव यांनी बुधवारी आपल्या लेटरहेडवर राजीनामा पत्र लिहून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्यात त्यांनी नाराजीचं कारण देत राष्ट्रवादीवर आरोपही केले होते. शिंदे म्हणाले, खासदार संजय जाधव मुख्यमंत्री साहेबांना भेटलेत. त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातील जी कामं होती ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी नाही. संजय जाधव यांनी कोणतीही नाराजी दर्शवलेली नाही. संजय जाधव यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे. ज्या मतदार संघात ज्या पक्षाचे आमदार खासदार आहेत त्या प्रमाणे कामाचं सूत्र ठरलेलं आहे. संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही त्यामुळे मागे घेण्याचा विषयच नाही.