IMPIMP

“राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : येत्या 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील विधान परिषदेतील 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यासाठी आता राज्यात 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे यातच भाजपने आपल्या पाच उमेदवाराची घोषणा केली आहे यामध्ये भाजपने महादेव जानकर यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी सदाभाऊ खोत यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केले त्यामुळे महादेव जानकर सध्या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या चर्चेवर आता महादेव जानकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी दोन टर्म विधान परिषदेत काम केलं आहे. आता वरचा मार्ग बघितला पाहिजे. मी कोणावरही नाराज नाही. आमच्या पक्षाची महायुतीसोबत युती आहे. जनतेने आम्हाला कौल दिला, तो आम्ही मान्य करतो. पुन्हा आमचा पक्ष कधी वाढेल त्यासाठी काम करणार आहे. मी स्वतः आता विधानसभा निवडणुक लढणार नाही. असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

यातच आम्हाला राज्यसभेसाठी शब्द दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुक लढवणार नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत आम्ही २५ जागांची मागणी करणार आहोत. सध्या तरी आम्ही महायुतीतील घटक पक्षासोबतच आहोत. पुढचा काही विचार आम्ही त्यावेळी घेऊ. असे देखील महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी महायुतीत आता जागावाटप कसं होणार ? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपचे आमदार जास्त असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे समसमान प्रमाणात आमदार आहेत. यातच विद्यमान आमदारांच्या जागेनुसार जागावाटप करण्यात आले तर महायुतीत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांना मनाविरुद्ध काम करावं लागेल. त्यामुळे जागावाटपाचा हा पेच नेमका कसा सोडवला जाऊ शकते. त्याची अधिक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

 

 

Leave a Reply