येत्या शनिवारी मी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदीरात दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मला अडवण्याची हिंमत करु नये, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे
कोरोना मुळे लावाव्या लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळापासून देशभरातील देवस्थाने बंद आहेत. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहेत. त्यामुळे कोरोना महामारी मुळे गेल्या पाच महिन्यांन पेक्षा जास्त काळ बंद असलेली महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे.
शनिवार के दिन #सिद्धिविनायकमंदिर दर्शन केले जाऊंगा महाराष्ट्र सरकार हमे रोकने के हिंमत ना करे #mva @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @CPMumbaiPolice
— Ram Kadam (@ramkadam) August 27, 2020
यासाठी वंचित बहुजन आघाडी व भाजपाच्या वतीने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरखुले करण्यासाठी आंदोलनाची हाक देखील देण्यात आली आहे. तर शिर्डी संस्थानच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. आता तर शिवसेनेच्या आमदारांनी देखील मंदिरांचे अर्थचक्र सुरु व्हावे व शेकडो जणांची उपजीविका भागवली जावी, यासाठी मंदिर उघडी करावीत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे.भारतीय जनता पक्षाबरोबरच आता शिवसेना आमदारही राज्यातली मंदीरे उघडण्याची मागणी करु लागले आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहीले आहे.