मुंबई : अगोदर शिवसेना त्यानंतर मैदान, मग धनुष्य़बाण आणि आता अंधेरी पोटनिवडणुकमध्ये शिंदे आणि ठाकरे आमनसामने आले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा जाणूनबुजून शिंदे सरकार रोखून धरत आहे. असा आरोप ठाकरेंकडून केला जात आहे. यातच ऋतुजा लटके यांनी महापालिकेला राजीनाम्यासंदर्भात दोन अर्ज केल्याचे उघड झाले आहे.
“प्रसंगी रक्ताचा सडा पडला होता, पण आता लाल बावटा ठाकरेंच्या मदतीला आला धावून”
विधानसभेची पोटनिवडणुक लढवण्यासाठी मी माझ्या पदाची 3 ऑक्टोंबरपासून राजीनामा देत आहे. महानगरपालिकेच्या सेवा नियमावलीनुसार माझी एक महिन्याच्या सुचनापत्राची अट विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे शिथिल करावी अशी विनंती ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रात केली आहे.
“कमळ अन् ढाल-तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला जागा दाखवू”; भाजपचा आघाडीवर हल्लाबोल
तसेच लोकाग्राहस्तव मला पोटनिवडणुक लढवावी लागत आहे. त्यामुळे पोटनिवडणुक लढवण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी असे लटके यांनी 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून काय होणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
“त्यावेळी आम्ही पण त्रास दिला असता, पण तसं केलं नाही”; काॅंग्रेसने शिंदे-फडणवीसांना झापलं
तसेच ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला नाही तर उद्धव ठाकरे यांनी आपली पुढची तयारी करून ठेवली आहे. शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभागप्रमुख प्रमोद सावंत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि विभाग संघटक कमलेश राय यांचे अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करण्याची तयारी सुरू केली आहे. या जागेवर 2019 च्या निवडणुकीत रमेश लटके यांना 62 हजार 773 तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती. आता मुरजी पटेल हे भाजपकडून ही निवडणुक लढवित आहेत.
Read also
- “पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
- “अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील
- “बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आलो, लोक म्हणतात यांचे डिपॉझिट जप्त होणार”
- माझी निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी”; ऋतुजा लटकेंनी विरोधकांना सुनावलं खडेबोल