IMPIMP
If possible, now find a constituency in Gujra, asked Dhananjay Munde If possible, now find a constituency in Gujra, asked Dhananjay Munde

“शक्य असेल तर आता गुजरामध्ये एखादा मतदारसंघ शोधा”, धनंजय मुंडेंना डिवचलं

पुणे : अतिशय झालेल्या अटीतटीच्या लढाईत बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटातील बजरंग सोनवणे यांनी अवघ्या सहा हजार मतांनी विजय मिळवला आहे. यातच यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील असतांना पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने त्याची चर्चा अधिकच सुरू आहे. त्यावरून आता शरद पवार गटातील पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी धनंजय मुंडेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा 

लोकसभेच्या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी जनतेचं आभार मानले आहेत. त्यावर पंकजाताईच्या या लढाईत ६ लाख ७७ हजार पेक्षा अधिक मतदानरूपी आशीर्वाद दिलेल्या मायबाप जनतेचे तसेच अहोराज्ञ परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार असं धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे. तसे च एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते. उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली. असं देखील मुंडेंनी म्हटलंय.

हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी 

त्यावर आता प्रशांत जगताप यांनी मुंडेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही काढलेलं पिस्तूल महाराष्ट्राने बघितलं आहे. आता विधानसभेला जनता मतदान यंत्राचा ट्रिगर दाबणार आहेत. शक्य असेल तर गुजरामध्ये एखादा मतदारसंघ शोधा आता. असेही त्यांनी म्हटलंय.

तर बीड मध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू. असेही त्यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..अमेठीत स्मृती ईराणींचा पराभव, कॉंग्रेसचे किशोरीलाल ठरले जायंट किलर 

हेही वाचा..१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी 

हेही वाचा..फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत, ठाकरे गटाच्या नेत्याने फडणवीसांना डिवचलं, म्हणाले..,

हेही वाचा..“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं 

हेही वाचा…“मला सरकारमधून मोकळं करा”, फडणवीसांचं मोठं विधान, राज्यात राजकीय उलथापालथ ??