IMPIMP
If RTO drinks milk with eyes closed, excise department looks drunk If RTO drinks milk with eyes closed, excise department looks drunk

“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुणे : पुणे कार अपघात प्रकरणी बाल न्याय सुधारमंडळाने अल्पवयीन आरोपीला निंबध लिहायला सांगत काही अटी घालून जामीन दिला होता. त्यानंतर संपुर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा परिणाम म्हणून पोलिसांनी तो जामीन रद्द करून आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. आरोपीची आता बाल सुधार गृहात १४ दिवसांसाठी रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले… 

या प्रकरणावरून आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं. पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं.  बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं.

हेही वाचा…शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर 

एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला. हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. इतरही सगळ्या विभागात हेच सुरु असून सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली ही व्यवस्था सरकार कुणाचंही असलं तरी केवळ पॉवरफुल लोकांना पायघड्या घालून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते. म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा” 

हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल 

हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार 

हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ?