IMPIMP
If Sharad Pawar had discussed with Modi, Sule would have been given the post of minister If Sharad Pawar had discussed with Modi, Sule would have been given the post of minister

“शरद पवारांनी मोदींशी चर्चा केली असती तर सुळेंना मंत्री पद दिलं असतं, पण….” कोणी केलं हे विधान

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा अलिकडेच पार पडला. आता फक्त निकालाची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यामध्ये वारंवार मी पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळत नाही असं विधान केलं. त्यावर आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला 

खरं तर मी अजितदादांचा खरा पुतण्या नाही. तसेच पवार साहेबांचा डायरेक्ट नातू सुद्धा नाही. परंतु यामध्ये मी पवार साहेबांबरोबर उभा राहिलो.. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि जगाला तुम्हाला सांगायचं असेल की मी घेतलेला निर्णय कसा चांगला आहे ? ते पटवून देण्याचा प्रयत्न अजितदादा करीत आहेत. अशातच जेवढी पदं अजितदादांना मिळाली तेवढी सुप्रिया सुळेंना मिळाली नाहीत. सुप्रियाताई खासदार झाल्या झाल्या मंत्री होऊ शकल्या असत्या. त्यावेळी तर केंद्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेचं सरकार होतं.  अशातच आता तरी शरद पवारांनी मोदींसोबत चर्चा केली असती तर सुप्रिया सुळेंना मंत्री पद दिले असते. पण तसं झालं नाही. त्यामुळे दादा जे म्हणतात ते फक्त कव्हर आहे. असेही रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

राष्ट्रवादी पक्षात ज्यावेळी फुट पडली होती. त्यावेळी मी कुठल्याही आमदारांना परत या म्हणून फोन केला नाही. कारण ज्यावेळी ते आमदार निवडून आणण्यात माझा काहीही वाटा नव्हता. त्यामुळे त्यांना परत बोलावण्याचा माझा कोणताही अधिकार नव्हता. अजित पवारांकडे राजकारणाचा ३० ते ३५ वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्यांना जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला. परंतु मी व्यक्तिगत पवार साहेबांसोबत राहिलो.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रातून बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत सर्वात चर्चेची ठरली आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीचे सर्वच नेत्यांनी झपाटून काम केले. तर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अनेक सभा घेतल्या. दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवारांनी पुर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढला. यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही चांगल्याच सभा पार पाडल्या.

READ ALSO :

हेही वाचा…“मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घ्या”, शरद पवारांची मोदींवर जोरदार टिका 

हेही वाचा…शुभेच्छा देण्याची लयच घाई..! निकालाच्या आधीच लागले ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर्स 

हेही वाचा…अखेर प्रफुल्ल पटेल विरोधकांसमोर झुकले, मोदींना जिरेटोप घालणं पटेलांच्या आलं अंगलट

हेही वाचा…मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं 

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे”