IMPIMP
Pankaja Munde or Bajrang Sonawane? Who will bet in Beed? Exit poll came in front Pankaja Munde or Bajrang Sonawane? Who will bet in Beed? Exit poll came in front

बीडमध्ये शरद पवारांचा पठ्ठ्या आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

बीड : लोकसभा निवडणुक मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 142960 मत पडली आहेत. तर शरद पवार गटातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना 144347 इतकी मत पडली आहेत. सध्या याठिकाणी बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत.

त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वर 1387 आघाडी घेतली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्या फेरीनंतर शाहू महाराज छत्रपती हे 25 हजार 740 मताने आघाडीवर आहेत. तर संजय मंडलिक सध्या पिछाडीवर गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मोदी सरकारचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. यामध्येय स्मृती इराणी, संजीव बालियान, कौशल किशोर, अजय मिश्रा, महेंद्र नाथ पांडे, अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाचवी फेरीत भाजपचे राम सातपुते 6,314 मतांनी आघाडी घेतली होती. मात्र पुन्हा कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांच्या वर तब्बल १२००९ मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 1,36,386 मते तर भाजपच्या राम सातपुते यांना 1,42,700 पडली आहेत.

संभाजीनगरात सातव्या फेरीत संदिपान भुमरे पुन्हा ८०३० मतांनी आघाडीवर आले आहेत. संदिपान भुमरे यांना ७१४५४ मत तर इम्तियाज जलील यांना ६३४२३मत पडली आहेत. मात्र ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ४८२११ मत पडली आहेत. याठिकाणी तिरंगी लढत होत असुन सरतेशेवटी काय निकाल हाती येणार? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.