काही दिवसांपुर्वी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्वबदलाची मागणी केली. यावरून पक्षांतर्गत मोठेच वांदग उठले होते. आता त्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे.
#BreakingNews | @INCIndia announces organisational changes in Party (2/2) pic.twitter.com/Tx1pDLYsYq
— Pratyush Ranjan (@pratyush_ranjan) September 11, 2020
याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला महासचिवपदी बढती दिली असून त्यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी असेल. सुरजेवाला हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त के. सी. वेणुगोपाळ यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. राजस्थान काँग्रेसच्या बंडखोरीत निरीक्षकांची भूमिका बजावणारे व नवनियुक्त प्रभारी अजय माखन यांना महासचिव बनवण्यात आले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात ए. के. अण्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.