IMPIMP

कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल

कोल्हापुर : लोकसभा निवडणुक संपल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने शरद पवार सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी शरद पवार सध्या अनेकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. याच दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापुर जिल्ह्याध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

कोल्हापुरात अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार कोल्हापुर दौऱ्यावर असताना अजित पवार गटातील प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापुर जिल्ह्याध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच ए वाय पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या आधी देखील शरद पवारांनी दोनदा कोल्हापुरचा दौरा केला होता. त्याही वेळेस कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल वाय पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा भेट घेतल्याने याठिकाणी मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

ज्या राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघातून ए वाय पाटील निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. ती जागा महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासह माजी आमदार के. पी पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. यातच पुढील काही दिवसात यासंदर्भात एक मेळावा आयोजित केला जाणार असून त्यात के. पी पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

यातच शरद पवार महाराष्ट्रातील वंदनीय नेते आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचं सहकार चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे असा नेता कोल्हापुरात आल्यानंतर सदिच्छा भेट घेणं म्हणजे भूमिका बदलली असं नाही. मुळात माझी भूमिका अजून बदलेली नाही आणि मी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. असेही के पी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

Leave a Reply