IMPIMP
In Manchar, the big Rada in Mahavikas Aghadi, Kolhe mentioned Nikam as 'future MLA In Manchar, the big Rada in Mahavikas Aghadi, Kolhe mentioned Nikam as 'future MLA

मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्…

पुणे : शिरूर मतदारसंघातून पुन्हा खासदार झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचा महाविकास आघाडीकडून मंचर येथे नागरी सत्कार ठेवण्यात आला. यावेळी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली. त्यानंतर कोल्हे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पंरतु कार्यकर्ते आणि कोल्हे यांच्यातच शाब्दिक बाचाबाची झाल्याने याठिकाणी महाविकास आघाडीतच मोठा राडा झाल्याचे बघायला मिळालं.

हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता. यामुळेत त्यांनी मंचर येथील कार्यक्रमात देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. परंतु याठिकाणी ठाकरे गटाने देखील मतदारसंघावर दावा सांगितल्याने कार्यकर्ते नाराज झालेत. यातच सभास्थळीच शिवसैनिकांनी मोठा राडा घातला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते ऐकायला तयार झाले नाहीत.

हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली 

“जे माझ्या मनात आहे, ते तुम्हाला सत्यात उतरवावे लागेल. गेल्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की, या माणसाचे नाव देवदत्त आहे की विश्वास ? त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये विश्वास जपला. यंदाच्या निवडणुकीमध्ये भलेभले मनात इमले बांधत होते. मात्र त्यांना उद्धवस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आणि आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला. ते भावी देवदत्त निकम साहेब आहेत.” असे अमोल कोल्हे म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ? 

हेही वाचा..“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार 

हेही वाचा..विधानसभेत महायुतीसमोर धोक्याची घंटा..! अन्यथा, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार ? 

हेही वाचा…“उद्या मी आयोध्येला गेलो तर रामाचा सन्मान ठेवीन, परंतु मोदींनी…”,शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं