IMPIMP
madhuri misal vs Shrinath Bhimale madhuri misal vs Shrinath Bhimale

पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

पुणे : पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला भाजपने लोकसभा निवडणुकीत घेतला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांवर दणदणीत विजय मिळवला. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदारांनी मुरली मोहोळांना मोठ्या मताधिक्क मिळालं. यातच आता राज्यात आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी आता आमदाराकीचं तिकीट आम्हालाच मिळणार ? असा दावा केला जात असून अनेक इच्छूकांनी तशी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड, कसबा आणि पर्वती मतदारसंघातून जास्त लीड मिळवता आलं. त्यांच्या विजयात याच मतदारसंघाचा मोठा वाटा राहिला आहे. यातच आता विधानसभेसाठी येथील काही स्थानिक नेत्यांच्या उमेदवारीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र उमेदवारीवरून भाजप अंतर्गत वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ आमदार आहेत. त्यांनी पुन्हा निवडणुक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र याठिकाणी आता भाजपचे लोकसभा समन्वयक म्हणून धुरा सांभाळलेले आणि पुणे महापालिकेचे माजी सभागृहा नेते श्रीनाथ भिमाले यांनी दावा सांगितल्याने हा पेच आणखी वाढला आहे.

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

श्रीनाथ भिमाले यांनी2024 साठी मागील काही महिन्यांपासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त करून दाखविली आहे. भिमाले यांनी पर्वती मतदारसंघामध्ये मोहोळांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. तर सोशल मीडियावर भावी आमदार श्रीनाथ भिमाले.. भाऊ भिमाले.. लढणार आणि जिंकणारच अशा प्रकारचे रिल्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे एका बाजूला माधुरी मिसाळ आमदार असतांना श्रीनाथ भिमाले यांनी देखील दावा सांगितल्याने भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, श्रीनाथ भिमाले यांनी १९९८ साली भाजप युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. २००२ पासून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्याचशिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. पुणे लोकसभेअंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून श्रीमाले यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

Leave a Reply