IMPIMP
Dhangekar's allegation of distributing money to BJP, Mohols hit back Dhangekar's allegation of distributing money to BJP, Mohols hit back

पुण्यात मुरलीधर मोहाळांची 37 हजार 693 मतांची आघाडी, कॉंग्रेसचे धंगेकर पिछाडीवर

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता यायला सुरुवात झाली आहे. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी मध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांवर मोठी आघाडी घेतली आहे.

मुरलीधर मोहोळ यांना आतापर्यंत १२५३०३ तर रवींद्र धंगेकर यांना १०२१०८ मत पडली आहेत. यात मुरलीधर मोहोळ यांनी सहावी फेरी अखेर 37 हजार 693 मतांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला मावळ मावळात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 44,689 मतांनी आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुक मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 142960 मत पडली आहेत. तर शरद पवार गटातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना 144347 इतकी मत पडली आहेत. सध्या याठिकाणी बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत.
त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वर 1387 आघाडी घेतली आहे.

संभाजीनगरात सातव्या फेरीत संदिपान भुमरे पुन्हा ८०३० मतांनी आघाडीवर आले आहेत. संदिपान भुमरे यांना ७१४५४ मत तर इम्तियाज जलील यांना ६३४२३मत पडली आहेत. मात्र ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ४८२११ मत पडली आहेत. याठिकाणी तिरंगी लढत होत असुन सरतेशेवटी काय निकाल हाती येणार? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.