IMPIMP

भाजपचे दिग्गज खासदार पराभावाच्या छायेत, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पाजलं पाणी

नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर येत आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना लोकांनी परत घरी पाठवलं आहे. राज्यात सध्या महायुतीचे १८ तर महाविकास आघाडीचे २९ उमेदवार आघाडीवर आहेत.

यातच केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी पराभावाची धुळ चारली आहे. याठिकाणी पंधरा वर्षाचा भाजपचा बालेकिल्ला भगरे यांनी उद्ध्वस्त केला आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना देखील पराभावाचा सामना करावा लागणार आहे.

यातच मंत्री राहिलेले भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा देखील कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला आहे. भिंवडीत देखील विद्यमान खासदार कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे. यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना देखील पराभावाचा सामना करावा लागला आहे.