मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उभे असलेल्या शेतकऱ्यांच्या पीकांचं नुकसान झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्यात ओला दुष्काल जाहीर करण्याची स्थिती सध्या नाही, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्यांचं पाण्याने केलेलं नुकसानीचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यावरून ते म्हणाले की, हे दृश्य पाहिल्यानंतरही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसत नसेल तर, येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ कसा असतो हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
“सतत वेड्याचे झटके येणे बरे नाही, त्वरीत उपचार करून घ्या”; रूपाली पाटलांचा बावनकुळेंना टोला
राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही हे कोण्या तोंडाने म्हणू शकता सत्तार साहेब? परतीच्या प्रवासाने व ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा पुरता हवाल दिल झालाय. आजच्या आज कॅबिनेटमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरकारचे खरे “हिंदुत्व” सिद्ध करा. असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर शेतकऱ्याच्या रानात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. उभं पीक पाण्यात गेलं आहे. तुम्ही त्याची दिवाळी गोड करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळत आहात. 50 खोके घेतले म्हणून तुम्हाला ओला दुष्काळ दिसत नाही. असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
हे दृश्य पाहिल्यानंतरही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसत नसेल तर , येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा ” दुष्काळ” कसा असतो हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे..!@mieknathshinde @Dev_Fadnavis @AbdulSattar_99 #ओला_दुष्काळ pic.twitter.com/FJVmmpjgtl
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) October 21, 2022
Read also
- “प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
- “राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
- “राष्ट्रवादीविरोधात शिंदे-फडणवीसांची पुण्यात मोठी फिल्डिंग”; दोन्ही बांजूचे नेते एकवटले
- “उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर ते वकिल किंवा डॉक्टर झाले असते”; आदित्य ठाकरे
- “ठाकरेंना क्लीन बोल्ड करण्यासाठी शरद पवार अन् मोदी एकत्र येतील”; केंद्रीय मंत्र्याचं सुचक वक्तव्य