IMPIMP
India Aghadi will get 295 seats in the country, Kharge made a big claim India Aghadi will get 295 seats in the country, Kharge made a big claim

इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पुर्ण झालं आहे. आता येत्या ०४ जूनच्या निकालाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याआधी आता काही वेळानंतर एक्झिट पोलचा सर्व्हे समोर येणार आहे. त्याआधी इंडिया आघाडी महत्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी इंडिया आघाडीला किती जागा मिळतील ? याचा मोठा दावा केला आहे.

हेही वाचा…“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप 

इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एक्झिट पोलवर चर्चा करतील लोकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील. आम्ही लोकांना वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. इंडिया आघाडी कमी कमी २९५ जागा जिंकणार आहे. हा जनतेचा सर्व्हे आहे. आमच्या नेत्यांनी केलेल्या सर्वेनुसार आम्ही हा आकडा सांगतो आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झालं. यामध्ये बिहारमध्ये ४२.९५ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ५८.४६, उत्तर प्रदेश मध्ये ४६.८३ टक्के, झारखंडमध्ये ६०.१४, पंजाबमध्ये ४६.३८ टक्के मतदान पुर्ण झालं आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पुणे कार अपघाताची पुनरावृत्ती, शिरूरमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एकाला चिरडलं 

हेही वाचा…२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किती जागा येतील? Exit Poll च्या आधी प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी 

हेही वाचा..जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्याल का ? नाना पटोलेंनी दिलं हे उत्तर 

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा, तर मराठवाड्यात गुरांना कोरडा चारही नाही” 

हेही वाचा…जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ?