कोरोना व्हायरस आणि देशातील आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढील 6-7 महिन्यानंतर देशात तरुणांना नोकरी मिळणार नाही, अशी गंभीर शक्यता राहुल गांधींना वर्तवली आहे.
…India will not be able to provide employment to youth. Media made fun of me when I warned the country that there will be heavy loss due to #COVID19. Today I am saying our country won't be able to give jobs. If you don't agree then wait for 6-7 months: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/QlkMhrS5H2
— ANI (@ANI) August 20, 2020
व्हर्च्युअल प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना राहुल गांधी सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हणाले की, ‘भारत तरुणांना रोजगार देण्यास असमर्थ ठरेल. जेव्हा मी देशाला कोरोनामुळे मोठे नुकसान सोसावे लागेल असा इशारा दिला तेव्हा मीडियाने माझी खिल्ली उडवली होती.
राहुल गांधी म्हणाले की, देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. मी आज सांगतोय की, भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर पुढील 6-7 महिने वाट पाहा.