IMPIMP
indian cricket team indian cricket team

“घेणं न देणं फक्त क्रेडीट घेण्याची घाई..!” राज्य सरकारच्या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवरून भारतीय क्रिकेट संघ गायब

मुंबई : विश्वविजेता ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघांचं काल मुंबईत दमदार स्वागत करण्यात आलं. यामध्ये मुंबईतील चार खेळांडूचा विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. विश्वविजेता ठरलेल्या चार खेळांडूंना प्रत्येकी एक कोटी रूपयाचं बक्षिस देखील जाहीर करण्यात आलं आहे. यातच आता विधानभवनात होत असलेल्या सत्कार सोहळ्याची राज्य सरकारकडून तयारी सुरू केली आहे. मात्र पोस्टरवर राज्यातील महायुती सरकारच्या नेत्यांचे फोटो आहेत. परंतु विश्वविजेता भारतीय संघांच्या खेळाडूंचे फोटो नाहीत. यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

तब्बल १७ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तर काल मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानावर रॅली आयोजित करण्यात आली. यातच रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल, सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने तयारी सुरू केली आहे. मात्र ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकही भारतीय खेळाडूंचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी सरकारवर टिका केली आहे.

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, या तिघांचं काय योगदान ? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे..! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये एकतरी खेळाडू दिसतोय का ? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर घेणं न देणं फक्त क्रेडीट घेण्याची घाई..! असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..जरांगे पाटलांच्या सुरक्षितेचा मुद्दा विधानसभेत, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली महत्वाची माहिती 

हेही वाचा…“वर्ल्ड कप जसा मोदींनीच जिंकलाय, असा त्यांचा वावर”, विरोधकांची मोदींवर जहरी टिका 

हेही वाचा…कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

Leave a Reply