मुबंई: भारतात जागतिक महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले आहे. जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा प्रमाण थोडं वेगळं आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत रुग्णांना जास्त त्रास यावेळेस दिसून आला आहे.त्यातच ऑक्सिजनचा भारतात मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यासाठी भारतीय नौदल आणि विदेशी देश मिळून एक ‘समुद्र-सेतू’ नावाची नावाची एक मोहीम राबवली आहे. विदेशातून समुद्र मार्गाने भारतात ऑक्सिजनचे टॅंक आणले जाणार आहेत.
आताच मुंबईच्या नौदल तळावर कतार देशातून ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस त्रिकंद ही युद्धनौका पोहोचली आहे. कतार मध्ये असणाऱ्या फ्रान्सच्या बेस मधून हा ऑक्सिजन आणण्यात आलेला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे विदेशी मित्र देशांनी भारताला मदत करण्यासाठी आपले हात पुढे केलेले आहेत. या देशांमध्ये फ्रान्स ,अमेरिका, रशिया,सौदी अरेबिया, कतार यांचा समावेश आहे. भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये नुकताच ‘वरुण’ नावाचा युद्धाभ्यास झालेला आहे. त्यानंतर लगेचच फ्रान्स ने भारताला मदत करण्याचे काम केले आहे.
INS Trikand reaches Mumbai with two 27 MT oxygen-filled containers from Qatar.
"The ship entered Hamad Port, Qatar on May 5 & embarked maiden shipment of oxygen containers which was facilitated by French Mission as part of oxygen solidarity bridge," says CO Capt Harish Bahuguna pic.twitter.com/7crkPbdA8M
— ANI (@ANI) May 10, 2021
तब्ब्ल ४० टन चा ऑक्सिजन साठा घेऊन आयएनएस त्रिकंद ही युद्धनौका आता मुंबई च्या नौदल तळावर आलेली आहे. हा सर्व ऑक्सिजनचा साथ मुंबई आणि पुण्यातील हॉस्पिटलांमध्ये जाणार आहे. पुण्यात आणि मुंबईमध्ये गेल्या आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता भासत होती. दोन मोठे ऑक्सिजनचा साठा असणारे ट्रायोजेनिक टॅंक त्रिकंद युद्धनौकेतून आलेले आहेत. ट्रायोजेनिक टॅंक असल्याकारणाने ऑक्सिजनची गळती होण्याचा धोका टाळतो. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतिच या संदर्भात पाहणी केली आहे.