IMPIMP
Inviting Modi, start campaigning for the Vidhan Sabha from now Thackeray scolded Modi Inviting Modi, start campaigning for the Vidhan Sabha from now Thackeray scolded Modi

“मोदींना आमंत्रण देतोय, विधानसभेला प्रचार आतापासून सुरू करा”, ठाकरेंनी मोदींना डिवचलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच जाहीर कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी ५८ व्या वर्धापनदिनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीला सामारे जाताना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणुकीला सामारे जा. नाहीतर विजते म्हणून फिरू नका. असे आव्हानच ठाकरेंनी शिंदेंना दिलं.

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ५८ वा वर्धापनदिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींवर टिका करतांना ते म्हणाले की, मोदींना मी आमंत्रण देतोय, विधानसभेला प्रचार आतापासून सुरू करा. माझ्या वडिलांऐवजी शिंदेंच्या वडिलांचा फोटो लावा व प्रचार करा. मग मी आहे व तुम्ही आहात असेही ते म्हणाले.

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

दरम्यान, सत्तेचा दुरूपयोग करून पक्ष फोडणे, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणे हा शासकीय नक्षलवाद आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लढणे हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..कार्यक्रम सुरू असताना वीज गेली, लंकेंनी थेट कार्यक्रमातच वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला झापलं 

हेही वाचा..लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू 

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

हेही वाचा…“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार 

हेही वाचा..“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

 

Leave a Reply