राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीच्या प्रकारानंतर पक्षांतंर्गत शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद इतर राज्यातही उमटताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. निरुपम यांना पक्षातून बाहेर काढा अशी शिफारस मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडला केल्याची माहिती आहे
या बातमीवर संजय निरुपम यांनी भाष्य केले आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी मी केली. शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचं शिवसेनेत विलिनीकरण झालंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
As per this report, Mumbai Congress leaders have demanded action against me.
Because,I wanted a probe into Shivsena leaders’ land scam,who happens to be CM of the state.
Is speaking against Shivsena an anti party activity?
Is Mumbai Congress merged into Shivsena? https://t.co/1ZQXl32CX9— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 16, 2020