नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करत नाही. तसेच याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देत नाही. तोपर्यंत नंदूरबारमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने घेतली आहे. त्यामुळे बोंडअळीच्या मुद्द्यावर राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी कापूस लागवडीपासूनच कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा कापसावर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे.
बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करा, अशी मागणी वारंवार भाजपकडून केली जात आहे. जर ही मागणी मान्य केली नाही, तर नंदूरबार जिल्ह्यात एकाही मंत्र्यांला फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.
Read Also :
पुढील पंधरा वर्षे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता, ‘या’ नेत्यांनी एकत्र येत व्यक्त केला विश्वास
ईडी चौकशी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
‘शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं’
हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणून ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला नाही: देवेंद्र फडणवीस
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका