IMPIMP
Narendra Modi vs Rahul Gandhi Narendra Modi vs Rahul Gandhi

मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला. पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोट पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला.

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

काल राहुल गांधी यांच्या भाषणानंतर आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली. सुरूवातीपासून नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. त्यानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. तर यावेळी नरेंद्र मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल झालं. हेडफोन लावून त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. यावेळी विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ पाहता नरेंद्र मोदी मध्ये मध्ये पाणी देखील पीत होते. त्यावरून विरोधक आणखीच मोदींना डिवचण्याचा प्रयत्न करतांना दिसले.

हेही वाचा…सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ 

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ करण्यास सुरू केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली.

READ ALSO :

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

Leave a Reply