मुंबई : फक्त आरोप करणं किरीट सोमय्यांचं काम, त्यांना भाजपमध्ये कुणी सिरियसली घेत नाही अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माजी खासदार भाजप नेते किरीट सोमैयांवर केली आहे.
मुंबईतील महानगरपालिकेत गैरव्यवहार आणि धार्मिक स्थळ उघडण्यावरून मागील काही दिवसांपासून किरीट सोमैय्यानी महाविकास आघाडी दरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांनी टीका केली होती आता त्याला उत्तर देताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हि टीका केली आहे.
किरीट सोमैय्या हे मुंबईत भाजपचे खासदार होते, त्यांना भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यांना डावलून भाजप नेते मनोज कोटक यांना ऐन वेळी उमेदवारी देण्यात आली होती, त्यावरून सोमैय्या काही काळ भाजपवर नाराजसुद्धा होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपासाठी काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान आज शरद पवार आणि पाकिस्तानच्या नेत्याचे विडिओ शेयर करत मोदींच्या 56 इंची छातीवर तहहयात भावी पंतप्रधान, सर्वच विषयातील तज्ञ, कलियुगातील हरिश्चंद्र म्हणजेच देशातील एकमेव जाणते शरदचंद्र पवारसाहेब यांनी विचारलेल्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर! अशी जहरी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.
Read Also ;
पवारांच्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर, भाजपचा पवारांवर हल्लाhttps://t.co/e3DfW4zZvO @BhatkhalkarA @NCPspeaks @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020