IMPIMP
It was Uddhav Thackeray who entrusted me with the responsibility against Ajit Pawar It was Uddhav Thackeray who entrusted me with the responsibility against Ajit Pawar

“अजित पवारांच्या विरोधात बोलायची उद्धव ठाकरे यांनीच माझ्यावर जबाबदारी सोपवली”

मुंबई :  पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची पक्षांतून हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते काय माझी हाकालपट्टी करणार मी सेनेचा राजीनामा देतो. असं म्हणत शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंवरच भयानक आरोप केले आहेत. शरद पवार आणि अजित पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच माझ्यावर जबाबदारी सोपवली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेते आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय वाद उफळून येण्याची शक्यता आहे.

“कसा निवडून येतो ते मी पाहतोच, अजितदादा बरोबर बोलले होते”? शिवतारेंची जाहीर माफी 

मवाळमध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या विरोधात बोलायला कुणीच नाही. त्यामुळे शिवतारे ही जबाबदारी मला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच दिली होती. त्यावेळी काही गोष्टी मी मांडल्या. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा ज्यावेळी उभा राहतो. त्यावेळी मर्यादा पाळायला हवी होती. ती माझी चुक होती. तेव्हाच अजित दादा म्हणाले होते की, कसा तु निवडून येतो मी पाहतोच, ते तेव्हा बरोबर म्हणाले होते. असं देखील विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

” निवडणुकीत घोडेबाजार हा उद्देश आघाडीचा होता, आमचा नाही” 

29 जुन रोजी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच जायचं नाही. उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडावी सर्व काही ठिक होईल. एकनाथ शिंदे यांनी तेच सांगितलं होतं. मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. माझी काय हकालपट्टी करणार. मीच सेनेतून बाहेर पडलो होतो. असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

“राज्यात कृषीमंत्री नसले तर आम्ही इथे आहोत, मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा” 

राज्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीला 56 टक्के निधी, काॅंग्रेसला 26 टक्के निधी आणि आमचा मुख्यमंत्री असून केवळ आम्हाला 16 टक्के निधी होता. त्यामुळे विकास कामे कशी करायची. मतदारसंघाचा विचार करत नसाल आणि निधीतील असमानता दुर केली नाही तर आम्ही पर्याय शोधू हे आम्ही त्यांना दीड दोन महिन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी मतदारसंघाच्या दृष्टीने काही ना काही तरी निर्णय घेतला पाहिजे असा आम्ही ठराव केला होता. पुढच्या काळाता अनेक बडे शिवसेना पदाधिकारी शिंदे सोबत असतील. माझ्याही संपर्कात अनेक जण आहेत. माजी आमदारही त्यात आहे. असंही शिवतारे म्हणाले.

Read also