IMPIMP
Jab Chaddar Lagi Phatne, Khairat Lagi Batne Congress's Forceful Criticism of Grand Alliance Budget Jab Chaddar Lagi Phatne, Khairat Lagi Batne Congress's Forceful Criticism of Grand Alliance Budget

“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी यावेळी सादर केला.  या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. महिला, शेतकरी, तरूण-तरूणी अशा विविध घटकांसाठी विविध घोषणांचा पाऊस यावेळी पाडण्यात आला. यावरून आता विरोधकांकडून जोरदार टिका करण्यात येत आहे.

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

आजचा अर्थ संकल्प हा लोकसभा पराभव झाल्यानंतर भेदरलेल्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण न होणाऱ्या योजना मांडल्या. मांडलेल्या योजनांच्या मूल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे .असे अर्थसंकल्पात मांडले आहेत. ह्याचा अर्थ मूल्यमापन व सुसुत्रीकरण चा विचार न करता अर्थ संकल्प मांडला. विधानसभा निवडणुका हरणार ह्या भीतीने तूटी मध्ये भारमसाठ वाढ करणारा अर्थसंकल्प अशी टिका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

तर जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने असा उल्लेख करत हा अतिरिक्त अर्थसंकल्प नसून महायुती सरकारचा विधानसभेचा जाहीरनामा आहे, जो प्रत्यक्षात येणे कठीण आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता आपले सरकार जाणार आहे.  याची कुणकुण लागल्यावर महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. पुढे आपले सरकार येणार तर नाहीच आहे. ज्यांचे येईल ते पाहतील, या हेतूने या अवास्तव घोषणा करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त संकल्पात कधीच एवढ्या आर्थिक घोषणा झालेल्या आठवत नाहीत. असा शाब्दिक टोला कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

Leave a Reply