राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याने त्यांच्या खात्याचा तात्पुरता कार्यभार जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बाळासाहेब पाटील यांची तब्बेत सध्या व्यवस्थित आहे. गेल्या शुक्रवारी त्याच्या कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
राज्यातील अनेक नेत्याना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. आता ते कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत सापडलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६६९ रुग्णांचा समावेश आहे. काल पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५६२, नगरपालिका क्षेत्रात १३४ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ७४ रुग्ण आढळून आले आहेत.
Also Read This
'पोलीस दलातील बदल्यांमधील आर्थिक गैरव्यवहारांची सीआयडी चौकशी करा', भाजप आमदाराची मागणीhttps://t.co/yWMiNseWn6
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 21, 2020