IMPIMP
Jayant Patil will leave Sharad Pawar's side, half of Sharad Pawar's group will be empty Jayant Patil will leave Sharad Pawar's side, half of Sharad Pawar's group will be empty

जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ?

मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सध्या अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ०४ जूनच्या निकालानंतर अजित पवार गटात मोठा बंड होणार असून सुनील तटकरे काही आमदारांनी घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शरद पवार गटातील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केलाय. तर अजित पवार गटातील युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असं म्हटलं आहे.त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ? 

मेहबुब शेख यांच्या दाव्यानंतर सुरज चव्हाण यांनी देखील मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा कॉंग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली असून त्यांचा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे येत्या ०४ जूननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट रिकामा होणार आहे. तिकडचे अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करतील असंही सुरज चव्हाण यांनी म्हटलंय.

हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले… 

यातच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील सुरज चव्हाण यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. जयंत पाटील हे यापुर्वीच भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये जातील अशी चर्चा होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे भविष्य जयंत पाटील यांना माहिती असल्याने ते कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप 

हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा” 

हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल 

हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार