मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. वारंवार चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे ही कारवाई करण्याच आल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई पोलिसांची बदनामी व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला भाजपने पाठिंबा दिला होता, हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झाले असेल. जीचे विचार समाजाकरिता घातक आहेत ती मुंबई पोलिसांची बदनामी व महाराष्ट्राचा अपमान करत असताना भाजपा नेते तीला पाठिंबा देत होते व वाय श्रेणीची सुरक्षा मोदी सरकारने दिली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. https://t.co/pyWQCBFykh
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 4, 2021
सचिन सावंत म्हणाले की, भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झाले असेल. जीचे विचार समाजाकरिता घातक आहेत ती मुंबई पोलिसांची बदनामी व महाराष्ट्राचा अपमान करत असताना भाजपा नेते तीला पाठिंबा देत होते व वाय श्रेणीची सुरक्षा मोदी सरकारने दिली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर कंगनाचे ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत आले आहे.