मुंबई : आज मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी राष्ट्रवादी पक्षप्रवेश केला आहे.मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. मला अशी अपेक्षा नव्हती कि भाजप मला अशा पद्धतीने वागणूक देईल, पण आता मोकळा श्वास सोडलंय आत प्रवेश करताना मी कुठलीही अट किंवा आमिष घेऊन राष्ट्रवादीत आलेलो नाही.
मी प्रामाणिकपने राष्ट्रवादीच काम करणार आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच यांनी प्रवेश करतानाच्या भाषणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पण आता एकनाथ खडसे विरुद्ध चंद्रकांतदादा पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे.
खडसेंनी ईडीची वाट बघू नये आधी सीडी पब्लिश करावी, असं थेट आव्हानच चंद्रकांतदादांनी एकनाथ खडसेंना दिल आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाषणादरम्यान खडसेंनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली. त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं ते म्हणाले. यावर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांनी ईडी लावण्याची वाट कशाला बघावी, आधी सीडी पब्लिश करावी, असं थेट आव्हान त्यांनी खडसेंना दिलं.
खूप दिवसांपासून म्हणत आहेत माझ्याकडे खूप काही आहे. एकनाथ खडसे आता विरोधी पक्षात गेलेत, त्यामुळे त्यांनी काही बोलावं आणि आम्ही ते ऐकून घ्यावं अस आता होणार नाही, त्यांनी शब्द जपून वापरावेत, अशी ताकीदही त्यांनी दिली. शिवाय, खडसेंना त्यांची ताकद दाखवायला कुणी अडवलं आहे. त्यांना आव्हान देऊ देत आम्ही काही आव्हान देत नाहीत, असंही ते म्हणाले.
दरम्यान बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला आहे. खडसे असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. आणि त्या आरोपांना फडणवीसांचे बळ आहे असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
Read Also ;
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…https://t.co/FV7JcEwwQb @AjitPawarSpeaks @NCPspeaks @EknathGKhadse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020