IMPIMP
Kharge made a fool of Modi, Bawankules showed Kharge made a fool of Modi, Bawankules showed

“खर्गेंनी मोदींना डिवचलं,” तोच व्हिडीओ बावनकुळेंनी दाखवत राऊतांवर साधला निशाणा

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या ०१ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ०४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी भगवानचा अवतार आहे. असं विधान केलं होतं. त्यावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींची एका कार्यक्रमात फिरकी घेतली. त्यांनी देखील हेच वक्तव्य पुन्हा केलं. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खर्गे यांनी मोदींवर केलेल्या मिमिक्रिचा व्हिडीओ पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी प्रधानसेवक म्हणून काम करणार असं विधान केलं होतं. त्यानंतर २०१९ साली मी देशाची चौकीदार म्हणून सेवा करणार अन् २०२४ साली नरेंद्र मोदी यांनी मी भगवानचा अवतार असं विधान केलं आहे. त्यावरून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मेरा नाम मल्लिकार्जून खर्गे. मैं इश्वर का अवतार हूॅं. असं म्हणत मोदींना डिवचलं आहे. अन् तोच व्हिडीओ चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केला आहे.

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

दरम्यान,  बावनकुळे म्हणाले आहे की, संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात? आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा.

READ ALSO :

हेही वाचा..“हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार ?” पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ? 

हेही वाचा..छगन भुजबळांचा यू-टर्न, म्हणाले, “एवढा काही मी मुर्ख नाही की…,” 

हेही वाचा…“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

हेही वाचा…विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ? 

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू