कोल्हापूर: महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर कोल्हापुरातील जिल्हा दूध संघ गोकुळच्या निवडणुकीची चर्चा जोरात आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे आजी मंत्री तर आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे माजी आमदार, खासदार गोकुळच्या रणांगणात उतरलेले आहेत. पारंपरिक वैरी असल्याने महाडिक घराणे आणि पाटील घराण्यात नेहमीप्रमाणे एका मेकांवर टीका केली जात आहे. निवडणूक रंगतदार होती असली तरी पण ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर रद्द करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक गोकुळ संघाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज झाली नाही. सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने आजची ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकली. गोकुळ मध्ये समाविष्ट असणाऱ्या दोन संस्थांनी ही याचिका दाखल केलेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार गोकुळची प्रक्रिया मात्र चालू आहे. 19 एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 26 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारकडून हे म्हणणे सादर केल्याचे समजते. Kolhapur Dudh Sangh – Gokul election adjournment hearing postponed again
परंतु न्यायाधीशांच्या निधनामुळे आजची सुनावणीच पुढे ढकलली गेली आहे. आता ही सुनावणी आज मंगळवार किंवा उद्या बुधवारी होण्याची शक्यता आहे. अश्या सर्व गोष्टी असल्यातरी नेत्यांकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून ठराव दारांना मात्र सहलीवर पाठवलेले आहे. गोकुळच्या प्रचार सभा चालू असताना ठराव दार मात्र आनंद लुटत आहे. विरोधी पक्ष अथवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे त्यांना काही घेणे देणे उरलेले नाही. ठरावदार नसताना होत असलेल्या टीका टिपणीची चर्चा अख्या कोल्हापुरात रंगली आहे.