कोल्हापुर: कोल्हापुरात आता गोकूक (जिल्हा दूध संघ )च्या निवडणुकीमुळे चांगलाच राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी पालकमंत्री बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक हे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. महाडिक आणि पाटलांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यातच विरोधी पॅनल वर टीका करताना मी सर्वांचा बाप आहे, योग्य वेळी सगळ्यांना भर चौकात उत्तर देईल असे वक्तव्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एका सभेत केले होते. त्यावरून कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी महाडिक सर्वांचे बाप नाही तर अख्ख्या जिल्ह्याचा ताप आहेत असे वक्तव्य केले होते.
आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील महाडिकांवर टीका केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाला या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. गोकुळचे सत्ताधारी हे 3 ,13, 23 तारखेला बिले दिली जातात, असे सांगतात. अहो, गवळी देखील १० दिवसाला शेतकऱ्याला पैसे देतात. नाही दिले तर दूध घालणार कोण ? पैसे देता म्हणजे काय उपकार करता का, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आता जिल्हा दूध संघाची निवडणूक ही फक्त नाम मात्र राहिली आहे. महाविकास आघाडीचा विजय मला स्पष्ट दिसत आहे.
बाप आहे ताप आहे यात भांडण्यात काहीही अर्थ नाही ये असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्याचा बाप आहे असे वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. या मुळे तुम्ही जिल्हातील सर्व लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान करत आहे. असे बोलणे हे न पटणारे आणि निंदनीय आहे. या मुळे तुम्ही जिल्ह्याचा अपमान केला आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. आता फक्त गोकुळच्या चेअरमन चे नाव घोषित होणे आहे बाकी तुम्हाला तर आपल्या विजयाची खात्री पटलेली आहे असे देखील ते उपस्थितांना म्हंटले आहे.