कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण गोकुळ दूध संघ निवडणुकीवरून Kolhapur Dugh Sangha – Gokul Election तापलेले दिसून येत आहे. आतापर्यंत पाच निवडणूक लढलो. त्यातील एक जिंकलो आणि पाच निवडणूका हरलो.महाडिकांना संपवण्याची भाषा करू राहिलेत,एवढी कसली घमेंड आली आहे. जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काही जण करत आहेत अशा शब्दात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळच्या निवडणुकीनिमित्त दोन्ही बाजूनी वाद प्रतिवाद घातले जात आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाडिक यांनी या वेळी गोकुळ सत्तेत असताना किती चांगली कामे केली याचे महत्व पटवून देताना राज्यात आत्महत्या होत असताना कोल्हापुरात एक पण आत्महत्या न झाल्याचे म्हटले आहे.
आत्महत्या न होण्यामागे गोकुळने शेतकऱ्यांना दिलेला आर्थिक आधार हे कारण असल्याचे धनंजय महाडिक यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी माजी आमदार संजय घाटगे यांनी पण विरोधकांचे तण वाढू न देता त्याचा वेळीच बंदोबस्त आवाहन उपस्थित मतदारांना केले आहे. यावेळी महाडिक आघाडीचे उमेदवार हजर होते.
सतेज पाटील म्हणाले होते
आपण आता सत्त्ता पालट करण्यासाठी शपथ घेतली आहे पॅनेल टू पॅनेलची. त्यामुळे ठरावधारकांनी फक्त कपबशी चिन्ह बघायचे व शिक्का मारायचा. इकडे तिकडे बघू नका, घोटाळा होईल. मतपत्रिकेत पै पाहुणे नातेवाइकांना हुडकू नका. कपबशीचा एकच ध्यास घ्या व शिक्का मारा, असे आवाहनही त्यांनी केले . दूध उत्पादकांच्या हाती सत्ता येण्यासाठी हा लढा उभारला गेला आहे, ही लढाई सत्तेसाठी नाही. दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. पंचवीस वर्षे एक हातातील सत्ता उत्पादकांच्या हातात देण्यासाठीची लढाई आहे. पाच वर्षे आमच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.