मुंबई – पुणे जिल्हातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी अनुयायांनी कोविड आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गर्दी करु नये, यंदाचे हे अभिवादन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरुन करुया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 6 ते 7 या वेळात अभिवादन केले आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी विजय स्तंभला अभिवादन करणयासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात.
शौर्य, विजय आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या शौर्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन… #शौर्यदिन#भीमाकोरेगाव pic.twitter.com/5CLRIcSxiU
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 1, 2021