नवी दिल्ली . एकीकडे बिहारचे राजकारण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
रांची येथील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव मानसिक तणावात गेले आहेत. तसेच मधुमेहाचा आजार असल्याने लालूंच्या क्रियेटनीन पातळीत अचानक वाढ झाली आहे.
रिम्समध्ये लालूंवर उपचार करत असलेल्या डॉ. उमेश प्रसाद यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्रियेटनीन पातळी अशीच वाढली तर लालूप्रसाद यादव यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता भासू शकते. याबाबतची माहिती हायकोर्टाला देण्यात आली आहे. हायकोर्टाने रिम्स प्रशासनाकडून लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याबाबत अहवाल मागवला होता.
Read Also :