पाटणा : सध्या देशात बिहार विधानसभा निवडणुकीने मोठ्या प्रमाणात राजकरण तापलेलं असताना आता माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि आता त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण आरजेडी कडून सर्व नेते आमदार आणि खासदारांनी ताकद पणाला लावलेली असताना आता त्यांच्याच सुनबाईने विरोधी उमेदवारासाठी प्रचार केल्याची अनपेक्षित आणि धक्कादायक बातमी येत आहे.
चंद्रिका राय हे पारसा विधानसभा मतदारसंघातील जेडीयू उमेदवार आहेत. त्यांनी येथून आरजेडीच्या तिकिटावर शेवटची निवडणूक जिंकली होती. त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचे लग्न लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांच्याशी झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. ऐश्वर्या राय यांनी लालूंच्या कुंटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडल्यानंतर चंद्रिका राय हे नितिशकुमार यांच्या पार्टीत सामील झाले.
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार कार्य सुरू आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महागठबंधनची सर्वांत मोठी परीक्षा आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचेही भाग्य ठरणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातच पारसा मतदारसंघात मतदान होणार आहे.
चंद्रिका राय हे पारसा विधानसभा मतदारसंघातील जेडीयू उमेदवार आहेत. त्यांनी येथून आरजेडीच्या तिकिटावर शेवटची निवडणूक जिंकली होती. त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचे लग्न लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांच्याशी झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. ऐश्वर्या राय यांनी लालूंच्या कुंटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडल्यानंतर चंद्रिका राय हे नितिशकुमार यांच्या पार्टीत सामील झाले.
Read Also :
मनसे नेते राकेश पाटील हत्येच्या चौकशीसाठी बाळा नांदगावकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट https://t.co/eskMbK2fRD @mnsadhikrut @BalaNandgaonkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020