IMPIMP
leader from Ajit Pawar group will take oath as cabinet minister leader from Ajit Pawar group will take oath as cabinet minister

अजित पवार गटाकडून ‘हा’ नेता घेणार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, दिल्लीत झालेल्या बैठकीत झाला शिक्कामोर्तब

मुंबई : देशात पुन्हा एकदा एनडीचं सरकार स्थापन होणार आहे. उद्या नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. तर काही कॅबिनेट मंत्री देखील यावेळी शपथ घेणार आहेत. राज्यातून महायुतीत शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील मोदींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या गटातील देखील काही खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा…“यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष “‘ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आलीय. उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल्ल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

हेही वाचा…मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला किती खाती मिळणार ? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच बोलले

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात लोकसभेच्या एकूण ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सध्या शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, आणि धैर्यशील माने यांचं नाव चर्चेत आलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजपने देखील एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे उद्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रक्षा खडसे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या आता कुणाच्या वाट्याला मंत्री पद येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका, बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर 

हेही वाचा..“मंत्रिपदासाठी राज्यातून भाजपची ४ नाव चर्चेत, नरेंद्र मोदींचा उद्या शपथविधी सोहळा 

हेही वाचा..ठाकरेंचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात, लवकरच करणार पक्ष प्रवेश 

हेही वाचा…विधानसभेत महायुतीसमोर मोठी अग्निपरिक्षा, निवडणुकीत ‘हे’ असणार आव्हाने 

हेही वाचा..“रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक”