IMPIMP
Leaders of Shinde gave a big confirmation that Shinde-Thakrey assembly will reunite in the state Leaders of Shinde gave a big confirmation that Shinde-Thakrey assembly will reunite in the state

“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अशातच मुंबईत शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अशा आशायचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का ? अशी चर्चा रंगली आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी देखील दुजोरा दिल्याने याची अधिकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त 

मुंबईत झळकलेल्या बॅनरनंतर संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, दोन्ही गटाच्या दिशा वेगवेगळ्या असून एक गट एका दिशेला तर दुसरा गट दुसऱ्या दिशेला आहे. मात्र, त्या दिशा बदलून एका दिशेला आले तर निश्चितच स्वागत केलं जाईळ. परंतु ज्या विचारसरणीमध्ये आणि या विचारसरणीमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. एकेकाळी शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहेत, असं सर्वजण म्हणायचे. मात्र आता काही लोक शरद पवार राहुल यांनी यांना आमचं दैवत म्हणायला लागले आहेत. त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. पण त्यांनी त्यांची स्टॅटर्जी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही.

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन 

दरम्यान, यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या की, शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. शिवसैनिकांसाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत. मात्र, ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कट कारस्थआन रचलं आणि हे कारस्थआन रचनाता शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला. अशा कपटी आणि  कारस्थांनी लोकांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असेही त्या म्हणाल्या.

READ ALSO :

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं 

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत