IMPIMP
Leave the Rajya Sabha, I rejected the candidature of the Lok Sabha Leave the Rajya Sabha, I rejected the candidature of the Lok Sabha

“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम

नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीतील नाशिक लोकसभेची जागा चांगलीच चर्चेची ठरली. सुरूवातीला शिंदे गट त्यानंतर भाजप अन् शेवटी राष्ट्रवादीनेही दावा सांगितल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. यानंतर ती जागा शिवसेना शिंदे गटाला गेली. यावरून अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आता छगन भुजबळ यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय.

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ? 

लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. तुम्हाला राज्यसभेसाठी शब्द दिलाय का ? त्यावरून तुम्ही नाराज आहात का ? त्यावर राज्यसभा सोडा, मी लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. असं काहीच नाही. मी नाराज वगैरे काही नाही. मी फुले-शाहू-आंबेडकर आणि समता परिषदेच्या विचारांचा पाईक आहे. मला खोटं बोलणं जमत नाही, त्यामुळे मी माझी स्पष्ट मतं मांडतो. असं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

 हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ? 

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावर देखील भुजबळांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की,  विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृती जाळण्याच्या कृतीचे समर्थन केले. तसेच त्यांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे म्हटले. मुंबईहून एवढ्या दूर महाड येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यासाठी गेले नव्हते. त्यांच्याकडून चूक झाली. पण मनुस्मृतीबाबत त्यांनी जे आंदोलन हाती घेतले, ते योग्यच आहे.

READ ALSO :

हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?” 

हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा 

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन 

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर