पाटणा : बिहारमध्ये बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. काल महाआघाडीतील जागा वाटपांचा तिढा सुटल्यानंतर आता एनडीएत मोठी फूट पडली आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा आणि लोजपा भाजपा सरकारचा प्रस्ताव पारित कण्यात आला.
निवडणुकीआधी एकत्र निवडणूक लढवणार नसले तरी निवडणुकीनंतर लोकजनशक्ती पार्टी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे देखील म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप बिहारमध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा वापर करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. जदयू आणि भाजप 119 -119 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत.