मंदिरं खुली करण्यासाठी राज्यात भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने देखील कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. आळंदी शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील रुग्णांची संख्य 300 च्या पुढे गेली आहे. मात्र उपाययोजना करायचे सोडुन आळंदी नगरपरिषदेचे सत्ताधारी भाजप मात्र मंदिरे उघडण्यासाठी घटांनाद आंदोलन करत आहे. याचा आळंदी शहरातील महाविकास आघाडीच्या पक्षानी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला आहे.
शिवसेना नेते उत्तम गोगावले यावेळी म्हणाले की, आळंदी नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसुविधेपेक्षा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करायला वेळ आहे. मंदीर उघडण्यापेक्षा कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करावे दोन-तीन दिवसात कोविड सेंटर सुरु नाही झाले तर महाविकास आघाडीच्या वतीने आळंदी नगरपरिषदेच्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रकाश कुऱ्हाडे, काँग्रेस नेते संदीप नाईकरे यांनी देखील भाजपने आंदोलने करण्यापेक्षा आळंदी शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे, असे म्हटले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर, माजी नगरसेवक आनंद मुंगसे, काँग्रेसचे संदीप नाईकरे पाटील, आळंदी विकास युवा मंचचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, मंगेश तिताडे, पुष्पाताई कुर्हाडे उपस्थित होते.