IMPIMP
Mahalakshmi Race Course land is unconstitutionally planned to be handed over to the builder-contractor Mahalakshmi Race Course land is unconstitutionally planned to be handed over to the builder-contractor

महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अन् भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या सुमारे १२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय थीम पार्क विकसीत करण्याच्या राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला  पर्यावरणप्रेमीने उच्च न्यायालयात आव्हान दिलेय. यावरून सध्या मुंबईत राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवलं आहे.

हेही वाचा..“मंत्रिपदासाठी राज्यातून भाजपची ४ नाव चर्चेत, नरेंद्र मोदींचा उद्या शपथविधी सोहळा 

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्डन क्लबबाबत मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपचा राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशी विनंती केलीय. यातच वेलिंग्डन क्लबमध्ये मागितलेली ५० सभासदस्व ही जणू भाडेपट्टीचं नतुनीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या लाचेसारखी असल्याचे ठाकरेंनी म्हटलंय. तर ती त्वरीत रद्द केली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

हेही वाचा..ठाकरेंचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात, लवकरच करणार पक्ष प्रवेश 

दरम्यान, रेसकोर्सचा आराखडा नागरिकांना आणि सदस्यांना दाखवणार असल्याचेही शासनाकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. तथापि महानगरपालिका आता अधिकृतपणे जमीन ताब्यात घेऊ पाहतेय आणि काम सुरू करण्याच्या विचारात आहे. ही जमीन बळकावून ते काम शेवटी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपाच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा आहे. राज्यपालांनी ह्यात हस्तक्षेप करून ही लाचखोरी आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा. असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“बारामतीत कुणी धमक्या देत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

हेही वाचा..“ही प्रभू श्रीरामांचीच लीला..!”, प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे भाजपचा पराभव

हेही वाचा..“मी आता थांबणार नाही, शांत बसणार नाही”, लोकसभेचा निकाल फडणवीसांच्या जिव्हारी, केली मोठी घोषणा

हेही वाचा..अजित पवार गटाकडून ‘हा’ नेता घेणार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, दिल्लीत झालेल्या बैठकीत झाला शिक्कामोर्तब

हेही वाचा…फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका, बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर