मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. दाऊदचा रराईट हॅन्ड बोलत असल्याचे सांगत कंगना प्रकरणात लक्ष न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर चार वेळा , रविवारी आणि मंगळवारी बंगल्यावर दोन वेळा धमकीचे फोन आले. आज फोन करणाऱ्याने ज्या पद्धतीने बोलणी केली, ते पाहता कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मंगळवारी सकाळी ११. ३४ ला गृहमंत्री देशमुख यांच्या स्थानिक निवासस्थानी लँड लाईनवर पुन्हा धमकीचा फोन आला. ऑपरेटरने फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड खालीद बोलतो, असे तो म्हणाला. ‘तुझ्या साहेबांना माझे नाव सांग आणि कंगना रानौत प्रकरणात जास्त लक्ष देऊ नका. असा निरोप दे, असे कॉलर म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.
याधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला होता. दरम्यान राज्यात कंगना रणौतवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कंगना उद्या मुंबईत येणार असून तिच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.