मुंबई : महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे.शिवसेना सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमुळे सत्तेत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या अशा वक्तव्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी पडू शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काल रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील अनेक कामांचा आढावा देखील घेतला.
जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे.यामुळे आता चर्चांचे एकच उधाण आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अशा विधानानंतर अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर चर्चेला मात्र निश्चित उधाण आले आहे.
Read Also
शरद पवार यांनी शब्द फिरवला 'या' माजी खासदाराने केला आरोपhttps://t.co/JaBGI1euiT#SharadPawar #NCP @rajushetti @PawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 28, 2020