मुंबई : “कंगनाने माफी मागावी अन्यथा चित्रपट सेट खाक करू”, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेने दिला आहे. अभिनेत्री कंगना रणौत त हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबद्दल राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
“महाराष्ट्र हि तुझी कर्म भूमी आहे, या मुंबईची तुलना पीओकेशी करायला तुला लाज वाटायला हवी” , असा शब्दांत करणी सेनेने कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. तसेच या मुंबईची माफी माग अन्यथा तुझ्या चित्रपटाचे सेट जाळून खाक करू, अशी धमकीही करणी सेनेने कंगनाला दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्याने राज्यभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.