मुंबई : मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक टिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरही अनेकांनी आपल्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.अचानक पद्धतीने संपूर्ण मुबईमध्ये वीज पुरवठा गेल्याने अर्धी मुंबई ठप्प झाली आहे. मंत्रालयापासून ते लोकल रेल्वेला देखील याचा फटका बसल्याचे पहायला मिळत आहे. बत्तीगुल झाल्याचा मुंबईला जोरदार शॉक लागल्याचे अनुभवयाला मिळत आहे. सर्वकाही आज वीज नसल्याने ठप्प झाले आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मुंबईमध्ये वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे.
अदानी समुहानेही ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ३८५ मेगा व्हॅट वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे अदानी समुहाने ट्विटरवरुन म्हटलं आहे.
AEML is currently supplying to critical services in Mumbai Around 385MW through AEML Dahanu generation. Our teams are working to restore the supply in the affected areas at the earliest. We regret the inconvenience caused. (2/2)
— Adani Electricity (@Adani_Elec_Mum) October 12, 2020
मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेलाही या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे.
Mumbai Suburban train services disrupted due to grid failure: Central Railways Chief Public Relation Officers (CPRO) #Maharashtra https://t.co/FxU4upma08
— ANI (@ANI) October 12, 2020
Read Also
‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्थ कळवा, 1001 रुपये मिळवा’
https://t.co/oM86JuEwUN#CmUddhavThackarey #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020