मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटल आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घातली. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली.
शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. मग हे दोन पक्ष एकत्र कसे येणार, असं विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या आधीही दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले होते. सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका सुरू होती. राज्यात सरकारमध्ये असलेली शिवसेना नाराज होती. पण अमित शहांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि युती झाली. त्यामुळे तणाव निवळू शकतो, अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. ‘उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,’ असा पर्याय आठवलेंनी सुचवला. ‘भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक – दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनी देखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावं,’ अशी साद आठवलेंनी घातली.
Read Also
नाशिकच्या पर्यटनाची विदेशात वाहवाह ! बोटक्लब 1 नंबर होईल,छगन भुजबळ यांचा विश्वासhttps://t.co/y3QZNKZcSs#ChhaganBhujbal #NCP@ChhaganCBhujbal
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020